राष्ट्रवादी फोडणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवणार, शरद पवार यांचा थेट इशारा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या प्रवृत्तीना त्यांची जागा दाखवून देणार असा इशारा शरद पवार यांनी कडारमध्ये बोलताना दिला आहे. ‘काही समाज विघातक प्रवृत्तीकडून महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका घेतली जात आहे.
त्याला तुमचे माझे सहकारी बळी पडले आहेत. परंतु सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, पण महाराष्ट्राची शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दात शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने शरद पवार यांनी कराडमधील प्रिती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. तसेच राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर पवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. यावेली बोलताना पवार यानी भाजपला अप्रत्यक्ष जागा दाखवून देण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, देशात आणि राज्यात चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे अधिकारांचं जतन केलं करण्याची गरज आहे. याच प्रवृत्तीकडून राज्यात जातीय तेढ, दंगे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या समाज विघातक प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची वेळ आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहु-फुले आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात या प्रवृत्तीने पक्षांना धक्का देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका या प्रवृत्तींनी घेतली आहे. त्याला तुमचे माझे सहकारी बळी पडले आहेत. परंतु सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील. परंतु महाराष्ट्राची शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या प्रवृत्तीना राज्यातील सामान्य माणूस त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. या प्रवृत्तीला बाजूला करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात कष्टकऱ्यांच आणि सर्वासामन्यांचं राज्य प्रस्थापित करू असा निर्धार देखील शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
पवार करड येथे जाणार हे कळाल्यानतंर प्रिती संगम येथे पवारांच्या समर्थनासाठी मोठ्या संख्येने राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रर्ते दाखल झाले होते. यावेळी पवारांसोबत त्यांचे जवळचे मित्र आणि खासदार श्रीनिवास पाटील हे देखील होते. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. पवारांनी पुन्हा एकदा पक्ष उभा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. तसेच या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले.