समृद्धी महामार्गावरील अपघातातील बसमधील प्रवाशांच्या नावांची यादी आली समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषणअपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातून आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती.
त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत.
या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी समोर आली आहे.
बसमध्ये एकूण 33 प्रवाशी प्रवास करत होते. बसला आग लागताच यातील 8 प्रवासी काचा फोडून बाहेर पडले. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुर्दैवी 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
डीएनए तपासणीसाठी सर्व मृतदेह बुलढाणा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त प्रवाशांमधील 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मेहकर रुग्णालयात 1 आणि सिंदखेडराजा रुग्णालयात 2 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज देण्यात आलेले सर्व प्रवासी औरंगाबादचे असल्याची माहीती आहे.
या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.