मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही ; पंंकजा मुंडेंचं मराठा अस्त्र…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवं करेन” असा एल्गार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड येथील सभेत बोलताना केला.
त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून त्यांनी राजकारणासाठी ‘मराठा अस्त्र’ उपसलं असल्याचं बोललं जातंय.
“ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं त्यावेळी मी सांगितलं होतं की गळ्यात कोणताच फुलांचा हार घालणार नाही. पण ते आरक्षण वाचलं आणि ते परत आता कोर्टात अडकलं, पण मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलले आहेत.
“आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदाली झडकावत नाही, मराठा समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल त्यांना शिकवता कसं येईल याचा प्रयत्न सरकार करत आहे. आरक्षण दिलंच पाहिजे पण भावनिक मुद्दा करून काहीच साध्य होणार नाही.” असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
“दुधाने तोंड पोळलंय पण आता ताकही फुंकून पिणार”
२०१९ ला आपल्यासोबत धोका झालाय. सर्वसमावेशक चेहरा म्हणून माझ्याकडे बघितलं जातंय. येणारं २०२४ हे इतिहास बदलणारं आणि इतिहास घडवणारं वर्ष असेल असेल पण आता आपल्याला दूध पोळल्यामुळे ताकही फुंकून प्यावं लागणार आहे अशी कडवट टीका पंकजा मुंडे यांनी केली.
राजकारणासाठी मराठा अस्त्र?
पंकजा मुंडे यांना स्वपक्ष असलेल्या भाजपकडूनच दुय्यम वागणूक मिळत असून त्यांना पक्षातून डावललं जातंय असं त्यांना बोललं जातं. त्या २०१९ च्या विधानसभा निवडणूक हारल्यानंतर त्यांना पक्षाने डावललं असून येत्या निवडणुकासाठी त्यांनी मराठा आरक्षणाचं अस्त्र काढलं आहे अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची पुढची दिशा कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.