राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलणार…? लवकरच संघटनात्मक बदलाची शक्यता….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होणार आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया येत्या दोन ते तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे. ॲागस्टपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला आहे.
स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार असल्याची चर्चा आहे सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षेच्या संघटनेत मला पद द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अजित पवार होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
काय म्हणाले होते अजित पवार –
मला विरोधी पक्षनेते पदामध्ये काहीही रस नव्हता. आमदारांनी आग्रह केला, सह्या केल्या त्यामुळे मी विरोधी पक्षनेता झालो. आता एक वर्ष झालं मी काम करत आहे. काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही. मग आता काय ह्यांची गचुरी धरु काय? असं म्हणून अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या भूमिकांना होत असलेला विरोध बोलून दाखवला होता.