‘फडणवीस मुख्यमंत्री होतील, उद्धव ठाकरे यांनी केलं होतं मान्य’, अमित शाह यांचा गौप्यस्फोट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- ”मी पक्ष अध्यक्ष असताना, मी आणि देवेंद्र फडणवीस जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी (मातोश्रीवर) गेलो होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं की, बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती”, असं केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले आहेत.
नांदेड येथे सभेला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
अमित शाह म्हणाले की, ”निकाल लागल्यानंतर एनडीए जिंकली. तेव्हा त्यांनी दिलेलं वाचन मोडलं. सत्तेसाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले.”
‘तीन तलाकवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी’
उद्धव ठाकरे यांना आव्हान देत अमित शाह म्हणाले की, ”मला उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, तीन तलाक हटवलं, त्याशी तुम्ही सहमत आहेत की नाही. हिम्मत असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करा.
अमित शाह म्हणाले, ”मुस्लिम आरक्षण हे संविधानाला धरुन नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम आरक्षण जायला पाहिजे की नाही? हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं.” ते म्हणाले, ”कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकरांचे धडे काढून टाकत आहे. याला तुमचं समर्थन आहे का? दगा देण्याचं, धोका देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे.”
तत्पूर्वी अमित शाह म्हणाले की, ”देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ते परदेशात गेले तर कुणी ऑटोग्राफ मागतंय, कुणी पाय धरतंय तर कुणी बॉस म्हणतंय. मोदींचा करिष्मा जगभर पसरला आहे.”