ठाकरेंसाठी काय पण…! शरद पवार घेणार मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा निर्णय घेताना हे जागावाटप ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस याआधी लोकसभा निवडणुकीत लढलेल्या 22 जागांचा आढावा घेत आहे. तर शिवसेना ठाकरे गट आगामी निवडणुकीत 18 ते 19 जागा जिंकण्याचा दावा करत आहे. तर काँग्रेसने सुद्धा लोकसभेच्या तयारीसाठी बैठकीचं नियोजन केलं आहे.
दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. लोकसभेसाठी ठाणे, कल्याण मतदारसंघ राष्ट्रवादी ठाकरे गटासाठी सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे तर कल्याण मधून श्रीकांत शिंदे खासदार आहेत. राजन विचारे ठाकरे गटात तर श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.
2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ठाण्यातून आनंद परांजपे तर कल्याण मधुन राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जागावाटपावर भाष्य केले होते. लोकसभेच्या जागांसाठी काही ठिकाणी तडजोड करावी लागली तर त्यासाठी योग्य समन्वय साधून निर्णय घेतले जातील. असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.