मान्सूनच्या विलंबामुळे महाराष्ट्रात जूनमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- यावर्षी 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सूनची प्रगती कशी होते यावर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हे निश्चित होणार आहे.
त्यामुळे जूनमध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला असला तरी यावेळी विलंब झाला असल्यामुळे दरवर्षी केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होणारा मान्सून यंदा मात्र उशीरा पोहचणार आहे. त्यामुळे 96 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे जूनमधे सरासरीच्या कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना जुनच्या सुरुवातीचे काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या तीन दिवसांपासून उकाड्याचा पार वाढत असताना बुधवारी (31 मे) मुंबईत कमाल तापमानाने 35 अंशांचा टप्पा पार केला. त्यामुळे कमाल तापमानापेक्षाही अधिक तापमानाची जाणीव होती. वळवाचा पाऊस पडल्यानंतर वातावरणात थोडासा गारवा पसरतो. मात्र, मुंबईमध्ये अजूनही वळवाचा न पडल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे बुधवारी 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आणि हे यंदाच्या मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे कमाल तापमान होते. आजही कमाल तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे.बुधवारचे सांताक्रूझ येथील तापमान हे सरासरीपेक्षा एका अंशाने अधिक असल्यामुळे मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेप्रमाणे तीव्रतेचा सामना करावा लागला. दुपारच्या वेळी हवेत इतकी उष्णता जाणवत होती की, लोकलमध्ये किंवा घरांमधील पंखे पूर्ण वेगाने सुरू असले, तरी नागरिकांना दिलासा मिळत नव्हता. बुधवारी मुंबईच्या दिशेने येणारे वारे उत्तर आणि वायव्य दिशेने वाहत असल्यामुळे बुधवारी तापमानात अधिक वाढ नोंदवली गेली. ही स्थिती गुरुवारीही कायम राहणार असल्यामुळे कमाल तापमानाचा पाराही ३६ अंशांच्या आसपास असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.राज्यात पारा 2 ते 3 वाढणार
संपूर्ण महाराष्ट्रातच येत्या पुढील तीन दिवसात पारा २ ते ३ अंशांनी वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोव्यामध्ये उष्ण आणि आर्द्र वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही उष्णतेची जाणीव होऊ शकते. मात्र विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही.