संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल ; म्हणाले, आज गोपीनाथराव असते तर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज गोपीनाथराव मुंडे असते, तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्यामुळे राजकीय कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घ्यायला हवा. तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील, असं म्हणत संजय राऊत यांनी खंत बोलून दाखवली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची काल जयंती होती. त्यानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून काल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील हजेर होते. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे. भाजप पक्ष मोठा आहे. मुंडे साहेब होते तेव्हा छोट्या-छोट्या माणसांना घेऊन बनवलं. तेव्हा पक्षाने सत्तेचं तोंड पाहिलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.