सावित्रीबाई फुलेंबद्दल ‘इंडिक टेल्स’ मध्ये आक्षेपार्ह लिखाण ; CM शिंदेंचे कडक कारवाईचे निर्देश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे.
तर मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून इंडिक टेल्स या वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर या प्रकाराचा निषेध करत राज्य सरकारनं या प्रकरणात भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील तसेच दिग्गज नेत्यांकडून कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाइटवर कारवाईचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईट वरील आक्षेपार्ह मजकूर तपासून कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक दिले आहेत.
‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह लिहिलं आहेत. या लिखाणाबाबत अनेक सामाजिक संस्थांनी, राजकीय नेत्यांनी सरकारकडे आक्षेप नोंदवले आहेक. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान महाराष्ट्र CMO वर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे की, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत.
याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.’