ठाकरेंना झटका! मुंबईतील ‘हा’ बडा नेता शिंदेगटात सामील, आदित्यच्या विश्वासू सहकाऱ्याने दगा दिला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटाला दणका देत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याअंतर्गत शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे.
शिवसेनेने ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते आणावेत, असा आग्रह शिंदे यांनी धरला आहे. दरम्यान, ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. घाटकोपरचे माजी नगरसेवक किरण लांडगे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र म्हणत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.
माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे घाटकोपरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.
यावेळी लांडगे म्हणाले की, आज मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खऱ्या शिवसेनेत ठाकरे गटातील अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत.
जी कामे बंद होती ती आता दिसू लागली आहेत. ती कामे आम्ही युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. आमचे सरकार आल्यावर मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आम्ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवल्या नाहीत, तर विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. याअंतर्गत आम्ही सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटने बनवत आहोत. आता मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. मुंबई चांगली होत असल्याचे तुम्ही पाहत आहात.
पण आमचे सर्व काही उघडे आहे.ज्यांना पोटदुखी आहे त्यांना मोफत उपचार मिळतात.सरकारचे लक्ष सर्व प्रकल्पांवर आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.
2017 मध्ये किरण लांडगेने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यामुळे सर्वांच्या नजरा तुमच्याकडे होत्या. आणि मग मी तुला शिवसेनेत प्रवेश दिला. आणि आता खऱ्या शिवसेनेत लांडगे दाखल झाले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.