खासदार बाळू धानोरकरांच्या पार्थिवावर आज झाले अंतिमसंस्कार, राज्यभरातील नेते चंद्रपूर जिल्ह्यात दाखल….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने महाविकास आघाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
त्यांच्या पार्थिवावर आज अंतिमसंस्कावर झाले आहे.
खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी राज्यभरातील अनेक नेते चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की संपूर्ण विदर्भासाठी व काँग्रेससाठी दुःखद घटना आहे. लोकनेता जाण्याचे आम्हाला दुःख आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी चाललो आहे, दिल्लीवरून राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांनी मुकुल वासनिक यांना पाठविले आहे.
दहा दिवसांत निखळ राजकारणी हरवला – खासदार बाळू धानोरकर यांना 19 मे पासून पोटात दुखू लागले आणि उलट्या होऊ लागल्या. सातत्याने हा त्रास सुरू असल्याने त्यांची सोनोग्राफी करण्यात आली. यात त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांना नागपुरातील अरिहंत रुग्णालयात हलविण्यात आले. यादरम्यान या संक्रमणाचे प्रमाण गंभीर झाले होते. या संक्रमणामुळे त्यांच्या पित्ताशयाला सूज होऊन हे संक्रमण हळूहळू त्यांच्या आतड्यांमध्ये आणि त्यातून रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरले.
कशामुळे होतात पित्ताशयात खडे- रक्तातील हे संक्रमण कमी करण्यासाठी त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले. मात्र त्यांच्या शरीराने पाहिजे तसा प्रतिसाद देणे बंद केला. यानंतर 28 मे रोजी त्यांना तातडीने हवाई मार्गे दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 30 मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे अतिरिक झाल्यास पित्ताशयात खडे तयार होण्यास सुरुवात होते. अशे खडे तयार झाल्याने पोटाच्या उजव्या भागात कधीकधी वेदना होण्यास सुरुवात होते. मळमळ उलट्या, गडद लघवी, आंबट ढेकर अशी लक्षणे यात दिसतात. जास्त चरबीयुक्त, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने देखील असे होऊ शकते, असे तज्ज्ञाचे मत आहे.
पित्ताशयातील संक्रमण हे रक्तात पोचल्याने आणि त्यावर शरीराने प्रतिसाद न दिल्याने खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाला-डॉक्टर सागर वझे
पंतप्रधान मोदी, राहुल गांधींसह दिग्गजांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना- खासदार बाळू धानोरकर यांनी आपली छाप दिल्लीत देखील सोडली होती. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर राहुल गांधी यांनी शोकसंवेदना व्यक्त करत बाळू धानोरकरांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरवरून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री शिंदे, विरोधीपक्ष नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. खासदार धानोरकरांच्या जाण्याने एक उमदा राजकारणी गमावला आहे.