लग्नाला आलेल्या संतोष बांगरांसमोर ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिंदे गटातील नेत्यांना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांचा होत असेलल्या विरोधामुळे अनेकदा नेत्यांची अनेकदा दमछाक होते.
शिंदे गटाच्या नेत्यांना 50 खोके घेत बंडखोरी केल्याचा आरोप सातत्याने ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे.
याच मुद्द्यावर शिंदे गटाचे नेते दिसले की 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली जाते. असाच एक प्रसंग शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासोबत घडला आहे.
आमदार संतोष बांगर काल रात्री परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे एका लग्न समारंभाला आले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि संतोष बांगर समोरसमोर आले. संजय जाधव यांना पाहताच संतोष बांगर यांनी त्यांचे चरणस्पर्श केले.
त्यानंतर संतोष बांगर पुढे निघून गेले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.