शेतकरी व गावातील लोकांनी आरोग्य शिबिराचे लाभ घ्यावे – लता दोनोडे
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
तालुका प्रतिनिधी/ सालेकसा
सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे चार दिवसीय विनामूल्य वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन आज पासून करण्यात आले. यावेळी मंचावरून गावातील शेतकरी व गोरगरिबांनी या विनामूल्य वैद्यकीय शिबिराचे लाभ घ्यावे असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लताताई दोनोडे यांनी लोकांना केले. अश्या प्रकारचे अजूनही शिबिर आपल्या या सालेकसा तालुक्यातील ग्रामीण भागात व्हायला पाहिजे असे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पुरुषोत्तम बाबा कटरे हे बोलत होते. या वेळी मंचावर अर्चनाताई राऊत सभापती पंचायत समिती सालेकसा, दिलीप भाऊ वाघमारे उपसभापती पंचायत समिती सालेकसा, तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चूटे, उमेदलाल जैतवार सभापती बांधकाम नगरपंचायत सालेकसा, राजेश जैन सदस्य रुग्ण कल्याण समिती, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश रोकडे, ओमप्रकाश ठाकरे, देवराज मरस्कोल्हे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पी. एस. रामटेके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गगन गुप्ता, डॉ.स्वप्नील जवरे, डॉ. कृपाल नाकाडे मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमा करिता उषा भट्ट, ममता वाढई,ममता लांजेवार, सविता हुकरे व रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन मयुरी राठोड यांनी केले तर आभार सागर राठोड यांनी मानले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….