आत्मा जिल्हा अंतर्गत भाजीपाला उत्पादन व निर्यात व्यवस्थापण शेतकरी प्रशिक्षण शिबीर
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- सडक अर्जुनी येथे तालुका कृषी अधिकारी व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) सडक अर्जुनीच्या वतीने आत्मा जिल्हा अंतर्गत जिल्हा स्थारिय भाजीपाला उत्पादन व निर्यात व्यवस्थापण शेतकरी प्रशिक्षण शिबीर तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आले.
सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुका कृषि अधिकारी व आत्मा अंतर्गत जिल्हास्थारिय शेतकरी प्रशिक्षण शिबीर तालुका तंत्रज्ञान (आत्मा) व्यवस्थापक राखी कहालकर यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन पंचायत समितीचे सभापती गिरधारी हत्तीमारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती राजेश काठाने, मंडळ कृषी अधिकारी कु. प्रतीक्षा मेंढे तसेच तंज्ञ मार्गदर्शक म्हणून नागपूर चे कृषी तंत्रज्ञ डॉ. गिरीश निखाडे, प्रफुल्ल बांडबुचे उपस्थित होते. यावेळी कृषी तंत्रज्ञ डॉ. गिरीश निखाडे यांनी शेतकऱ्यांनी धान पिकानंसोबत बागायती पिकांचे ही उत्पादन करण्याचे आवाहन केले.तसेच प्रफुल्ल बांडेबूचे यांनी शेतकऱ्यांना प्रोजेक्टरवर भेंडी, लवकी,चवळीच्या सेंगा, टोमॅटो व इतर पालेभाज्या फळ बागायती सेंद्रिय खाताद्वारे शेतात कसे उत्पादन करता येते या बद्दल मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले तालुका कृषी अधिकारी पात्रीकर यांनी सेंद्रिय खत कसे तयार करावे,सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले व शेतीविषयक विविध माहिती दिली तसेच प्रमुख अतिथींनी शेतकऱ्यांनी धान पिकानंसोबत बागायती पिकांचे ही उत्पादन करण्याचे आवाहन केले. यावेळी संचालन व आभार तालुका तंत्रज्ञान (आत्मा) व्यवस्थापक राखी कहालकर यांनी केले तर आभार सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक जी. एस. मस्के यांनी मानले.यावेळी कृषि सहायक सुशील वाघाये, जे. एस. लांबकाने,संजय कुंभलवार,जे. पी. राऊत, अपूर्वा गहाने, वीरेंद्र बिसेन, जे.सी. वाढई, जी. एस मस्के तसेच तालुक्यातील शेतकरी,नागरिक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…