जागतीक महिला दिन म्हणजे संघर्षातून मिळालेल्या विजयोत्सवाचा दिवस
- नगर महिला बुरुड समाजाच्या वतीने जागतीक महिला दिनाचे आयोजन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर
चंद्रपूर – मानव आणि त्याच्या अधिकारांसाठीचा संघर्ष अदयापतरी संपलेला नाही. मात्र त्याकाळी सविधानीक अधिकारासाठी झालेली आंदोलने जास्त महत्वाची होती. जर तूमाला तूमचे प्राथमीक अधिकारच मिळणार नाहीत तर तूम्ही पूढच्या गोष्टीसाठी संघर्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महिलांच्या याच अधिकरासाठी त्याकाळी महिलांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च करत प्रंचड संघर्शातून आपल्या झोळीत उज्ज्वल भविष्य टाकले आहे. त्यामूळे हा दिवस महिलांनी आपल्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाचा आणि त्या संघर्षातून मिळालेल्या विजयाच्या विजयोत्सवाचा दिवस असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
नगर महिला बुरुड समाजाच्या वतीने जागतीक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मीनाक्षी वाळके, नलिनी वनकर, अँँड दीपांजली मंथनवार, कल्याणी जोरगेवार, छाया जोरगेवार, कमल पुट्टेवार, चेताली पद्ममगीरवार, पूनम चांदेकर, धनंजय तावाडे, शिल्पा पटकोतवार आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, महिला सर्वच क्षेत्रात नाव लौकीक करत आहे. आजवर पूरुषांची ख्याती असलेल्या क्षेत्रावरही महिलांनी यशस्वी ताबा मिळवीला आहे. आठव्या वर्गा नंतर विदयार्थीनींना सायकल देण्यात यावी अशी मागणी मी अधिवशनात केली असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीतले
महिला सक्षमीकरणासाठी शासनस्थरावर प्रयत्न सुरु आहे. असे असले तरी यात पूर्णताह यश आलेले नाही ही सुध्दा वस्तूस्थिती आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महिलांसाठी मोठे पाऊल उचलल्या जात आहे. महिलांसाठी प्रत्येक जिल्हात स्वतंत्र पोलिस स्थानके तसेच महिला आयोग केंद्राची निर्मीती करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. असेही यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी सांगीतले. वाघाच्या किरर्र जंगलात जावून बांबू आनणारा हा धाडसी समाज आहे. त्यातही या समाजातील महिला यात अग्रस्थानी आहे. समजातील महिलांमूळेच बुरुड समाजाचा बांबूंपासून सुप टोपल्या बनविण्याचा पारंपारीक व्यवसाय आजही सुरु आहे. मात्र आता समाजाने अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हा व्यवसाय विस्तारीत करावा असेही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. सृढरुळ समाज घडविण्यात महिलांची मोठी भूमीका असते. त्यामूळे समाजातील महिलांना सशक्त करण्याची गरजही यावेळी आ. जोरगेवार यांनी बोलून दाखवली यावेळी मीनाक्षी वाळके बोलतांना यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या कि, सध्या बांबू पासन विविध वस्तू बनविल्या जात आहे. ही कला आता समाजबांधवांनीही आत्मसाद करायला हवी, यातून समाज आर्थिक प्रगत होणार असून समाजाला आपला पारंपारीक व्यवसायही जपता येईल असे त्यांनी सांगीतले या कार्यक्रमाला बूरुड समाजातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…