१० व्या वर्गात शिकणाऱ्या तरुणांची पेपर देऊन परत येत असताना केली हत्या
- अज्ञान आरोपीने केला चाकूने वार
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
गोंदिया :- गोंदीयाच्या मोरवाही गावात आपसी वैमनस्यातुन १० व्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय अतुल तरोणे या तरुणावर चाकुने वार करत गावाजवळच हत्या करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मध्ये खडबड उडाली आहे.
मोरवाही गावातील १७ वर्षीय अतुल तरोने हा दाहाव्या वर्गात शिकत असुन काल १० व्या वर्गाचा मराठी विषयाचा पेपर आठोपुन तो गावी परत येत असताना . गावा शेजारी शेतात दबा धरुन बसलेल्या आरोपीने अतुलला अडवत शेतात नेऊन त्याच्या गड्यावर पाठिवर तोंडावर चाकुने वार केले आरोपीने अतुलची जिभ देखील कापली असुन, याची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. मृतदेह ताब्यात घेत स्वविछेदना करिता पाठविण्यात आले. १० व्या वर्गाची परिक्षा सुरु असताना अतुलची अज्ञात आरोपीने हत्या केल्याने विद्यार्थ्यांन मध्ये दहशतीचे वातावरण तयार निर्माण झाले असुन गोंदीया ग्रामीण पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’