ते पक्षीय राजकारण होते ; सत्यजीत तांबे प्रकरणावरून बाळासाहेब थोरात यांची स्पष्ट भूमिका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांच्याबद्दल त्यांचे मामा व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
या निवडणुकीत जे राजकारण झाले ते व्यथित करणारे होते, परंतु ते पक्षीय राजकारण असल्याने बाहेर बोलणे योग्य नाही असे स्पष्ट मत थोरात यांनी व्यक्त केले.
सत्यजीत तांबेप्रकरणी बाळासाहेब थोरात काय भूमिका मांडतात याकडे काँग्रेससह सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले होते. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी आज थेट रुग्णालयातून कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले की, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठे राजकारण झाले. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचे अभिनंदन करतो. घडलेल्या प्रकाराबाबत मी माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे.’