विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार लढत होणार आहे. या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.
कोकण, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक या पाच मतदारसंघात या निवडणूक होणार आहेत. कोकणमध्ये शेकापचे बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे विरुद्व भाजपचे किरण पाटील अशी लढत होणार आहे.
भाजपच्या नागपूर या बालेकिल्ल्यात ना. गो. गाणार आणि महाविकास आघाडीचे गंगाधर नागडे, अमरावती पदवीधर मतदासंघातून भाजपचे रणजित पाटील महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे रिंगणात उतरले आहेत. नाशिकमध्ये मात्र कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली असून सत्यजित तांबे अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत.