मोठी बातमी…! काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं निधन ; भारत जोडो यात्रेत आला हृदयविकाराचा झटका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संतोख सिंह यांनी 2014 आणि 2019 मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे.
काही वेळापूर्वी पदयात्रेत सहभागी असलेले काँग्रेस खासदार संतोख सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहून त्यांना तातडीनं फगवाडा येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
इथं त्यांच्यावर काही काळ उपचार सुरू होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे. संतोख सिंह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानं राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ हॉस्पिटलला रवाना झाले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
संतोख यांनी 2014 आणि 2019 मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यांच्या निधनानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केलं की, ‘जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनानं मला खूप दुःख झालं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.’