त्यांचे काही आमदार आमच्या संपर्कात…; उदय सामंत यांचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या सुनावणीवरून शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटातील नेते वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत.
अशात आता मंत्री उदय सामंत यांनी तिथले अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने ठाकरे गटापुढे पुन्हा एकदा मोठे संकट येणार का? असा प्रश्न निर्माण होतं आहे.
कोर्टाच्या नर्णयानंतर हे सरकार पडणार आहे. शिंदे – फडणवीस सरकार जिवंत नसून मृत सरकार आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देत मंत्री उदय सामंत म्हणाले की, “त्यांच्या दाव्यंकडे मी लक्ष देत नाही. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. २० जुनपासून त्यांना धडकी भरली आहे. तिथले अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात आहेत.” असा खुलासा उदय सामंत यांनी केलाय.
माध्यमांशी बोलताना पुढे ते म्हणाले की, “आम्ही सगळे पुरावे सादर केले आहेत, सरपंच, खासदार आमच्याकडे आहेत. बच्चू कडू जरी असं बोलले असतील तरी ते आमचे सहकारी आहेत. योग्य वेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल. बच्चू कडू हे समंजस आणि लोकनेते आहेत. त्यांची समजूत काढली जाईल. शिक्षक संघटनेच्या जागा भाजप आणि आम्ही जिंकू” असे उदय सामंत म्हणाले.
सदर सुनावणीत ७ न्यायमूर्तींच्या खांपीठाकडे हे प्रकरण जावं असं ठाकरे गटाच म्हणणं आहे. यावर बोलताना न्यायालयात सुनावणी सुरू असताना आपण यावर बोलणं योग्य नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..