केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ‘या’ 2 खासदारांना मंत्रिपद……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. येत्या जानेवारीअखेर केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच खातेपालटही होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटातील 13 पैकी 2 खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या 2 खासदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री बनवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
कोण आहेत ते 2 खासदार?
मोदी सरकारमध्ये मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे आणि बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव या दोघांना मंत्रिपद मिळू शकतं. प्रतापराव जाधव हे 3 वेळा बुलडाण्यातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. तर राहुल शेवाळे यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर शिवसेनेचे 13 खासदारही शिंदे गटात सामील झाले.
शिंदे गटातील खासदार
हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, धैर्यशील माने, संजय मंडलिक, सदाशीव लोखंडे, भावना गवळी, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, हेमंत पाटील आणि गजानन कीर्तीकर.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….