निलंबनानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, ‘अजुनही सांगतो….’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापल्यानं त्यांचे निलंबन करण्यात आले.
यासगळ्या प्रकरणावर पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. अजित पवार यांनीही बोलू देण्याची मागणी केली, पण नार्वेकर यांनी नकार दिला. त्यावेळी, अध्यक्ष महोदय, तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका, अशा शब्दात जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्यावरुन सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत पाटील यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती.
अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांनी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधापक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
आपल्या प्रतिक्रियेमध्ये जयंत पाटील म्हणाले की, माझा माईक चालू नव्हता. मी भाषण करत नव्हतो. अनेक आमदार समोर उभे होते. सगळ्यांचा आवाज येत होता. अशावेळी आमच्या लोकांना म्हणजे आमचे नेते भास्कर जाधव यांना बोलू दिले जात नव्हते. खरं तर या गोष्टी सरकारनं लक्षात घ्यायला हव्यात. दुसरं म्हणजे यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारी पक्षच आंदोलन करताना दिसतो आहे. तेच घोषणा देतात आणि सभागृहात जातात. सत्ताधारी पक्षानं सभागृहाची रया घालवली आहे. माझे तर निलंबन झाले आहे. आता तीनही पक्षांनी मिळून भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे. दरम्यान, अपशब्द वापरल्या प्रकरणी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आल्यानं ते आणखी चर्चेत आले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….