संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आठवडाभराआधीच सूप वाजणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे निर्धारित कालावधीच्या एक आठवडाभरापूर्वीच म्हणजे येत्या २३ तारखेला सूप वाजणार असल्याची माहिती आज ( दि. २०) सूत्रांनी दिली.
विविध मुद्यांवरील गदारोळामुळे उभय सदनांचे कामकाज सुरळीतपणे चाललेले नाही. त्यामुळे अधिवेशन लवकर संपविण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार येत्या 29 डिसेंबरपर्यंत संसदेचे कामकाज चालणार होते. अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील चीनी घुसखोरीचा प्रयत्न, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे वादग्रस्त वक्तव्य, मौलाना आझाद शिष्यवृत्ती बंद करणे आदी मुद्यांवरुन विरोधक आक्रमक आहेत.
मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीज विधेयक संसदीय समितीकडे पाठविले….
दरम्यान बहुराज्य सहकारी सोसायट्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने लोकसभेत सादर करण्यात आलेले मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीज विधेयक अधिक विचारविमर्शासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी विधेयकातील तरतुदींना आक्षेप घेतल्यामुळे हे विधेक संसदीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….