नागपूर विधानभवनावर वंचित बहुजन आघाडीचा भव्य महामोर्चा..….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- सत्ताधाऱ्यांतर्फे महाराष्ट्रातील महापूरूषांचा सातत्याने होत असलेला अपमान व जनसामान्यांच्या इतर अनेक मुद्यांवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात २७ डिसेंबर २०२२ रोजी भव्य महामोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्याच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मोर्चामधे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते शामिल होतील. जवळपास १ लाख लोक या मोर्चामधे सहभागी होतील.
नागपूरच्या आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीमधे सदर निर्णय घेण्यात आला. भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, पूर्व विदर्भाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजबे, ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, आदिवासी नेता अरविंद सांदेकर, भगवान भोंडे, नागपूरचे शहर अध्यक्ष रवी शेंडे तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..