महागाईवरून काँग्रेस मोदी सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात ; तर भाजपासमोर विधेयकं पारित करण्याचं आव्हान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. तीन आठवडे चालणारे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यादरम्यान, मुख्य विरोधीपक्ष असलेला काँग्रेस पक्ष बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
अशातच सत्ताधारी भाजपासमोर अनेक विधेयकं पारीत करण्याचे आव्हान असणार आहे.
विरोधकांकडून ‘या’ मुद्द्यांवर चर्चेची मागणी
या अधिवेशनादरम्यान काँग्रेस पक्ष बेरोजगारी, महागाईसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. तसेच ईडी- सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा दुरुपयोग, अरुणाचल प्रदेशमध्ये चीकडून करण्यात आलेली घुसखोरी, न्यायव्यवस्थेबरोबर सरकारचा सुरू असलेला संघर्ष, मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, स्वायत्त संस्थांचे पतन यासह अनेक मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात बोलताना, आम्ही निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी असेलले आरक्षण यासंदर्भात चर्चा करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली असल्याची माहिती राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद सय्यद नसीर हुसेन यांनी दिली.
तृणमूल काँग्रेसनेही बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच पश्चिम बंगाल सरकार अस्थिर करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. सरकारने या मुद्यावरही चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बीजेडीने महिला आरक्षण विधेयक, तर आम आदमी पक्षाने वृद्धांची पेंशन आणि शेतकऱ्यांना धान्यांवर मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमतीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे.
”विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर चर्चेची तयारी”
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सरकारकडून अधिवेशनादरम्यान मांडणात येणाऱ्या विधेयकांबाबत माहिती देण्यात आली. तसेच विरोधकांनी या विधेयकांना समर्थन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबरोबच विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेण्यात आली असून संसदेच्या कार्यपद्धीनुसार चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते.
तीन आठवडे चालणार अधिवेशन
संसदेचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू झाले असून हे अधिवेशन तीन आठवडे चालेल. यादरम्यान, २५ विधेयकं पारित करण्याचा भाजपा प्रयत्न आहे. यापैकी सात विधेयकं जुने असून १७ विधेयकं नवीन आहेत. तर एक वित्त विधेयक आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..