गुजरातमध्ये आपची १० जागांवर आघाडी, काँग्रेसला मोठा फटका, भाजपला किती जागा…? पहा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गांधीनगर :- गुजरात विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले असून आम आदमी पक्षाने १० जागांवर आघाडी घेतली आहे.
हिमाचलप्रदेशात भाजप ३१ तर काँग्रेस ३३ जागांवर आघाडीवर आहे. अशातच हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिमाचलप्रदेशात मोठी जबाबदारी मिळाली आहे. भाजपला हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडल्या तर देवेंद्र फडणवीस अपक्ष उमेदवारांची मदत घेऊन येथे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. सध्या देवेंद्र फडणवीस हे हिमाचलच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले असून आम आदमी पक्षाने १० जागांवर आघाडी घेतली आहे. गुजरातमध्ये आपच्या एन्ट्रीचा काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत फक्त १९ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपने मात्र ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल केली असून तब्बल १४९ जागांवर आघाडी घेतली आहे.
हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ६८ जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. याठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हिमाचलप्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. हिमाचलप्रदेशात काँग्रेस ३५ तर भाजप ३२ जागांवर आघाडीवर आहे.
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. गुजरातमध्ये सुरूवातीलाच भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप 131, काँग्रेस 48 तर आम आदमी पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपने जरी आघाडी घेतली असली तरी त्यांचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
गुजरात विधानसभेच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरूवात झाली असून मतमोजणीच्या सुरूवातीलाच भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. प्राप्त माहितीनुसार, भाजप 65 जागा,काँग्रेस 22 जागा, आणि आप 3 जागांवर आहे.
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या दोन्ही राज्यांची सूत्रे कोणाच्या हातात जाणार हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून दोन्ही राज्यांतील मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.