आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशन तर्फे 25 हजाराची मदत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद तालुक्यातील हर्षी येथील तरुण शेतकरी हनुमान कुरकुटे यांनी काही महिन्यापूर्वीच कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या करून आपले जीवन संपविले. सदर घटनेची दखल जेष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने घेऊन, नाम चे विदर्भ खानदेश प्रमुख हरीश दादा इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली नामचे पुसद उपविभागीय समन्वय स्वप्नील देशमुख व त्यांच्या टिमनी दि. 4 डिसेंबर रोजी हर्षी येथे जाऊन 25 हजार रुपयाचा धनादेश मृताची पत्नी वत्सला हनुमान कुरकुटे यांना देण्यात आल्याने संपूर्ण गाव वासीयांनी नाम फाऊंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद मानले.
मृत हनुमान यांच्यापश्चात आई, पत्नी, एक मुलगी व दोन मुले यांचा समावेश आहे. सदर भावनात्मक कार्यक्रमाच्या प्रसंगी नाम चे धनंजय देशमुख, पवन देशमुख, सुरेश आढाव, त्रिशूल चव्हाण, श्रेयश, शिव-रिध्दी उपस्थित होते.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….