…तर राज्यपालांना अटक होऊ शकते ; याचिकाकर्त्याने सांगितली घटनेतली तरतूद….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्यांची उचलबांगली होईल, असंही बोललं जात आहे.
मात्र या प्रकरणातील याचिकाकर्ते यांनी एक महत्त्वाची दिली आहे.
भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि राज्याच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतले. या मुद्द्यांवरुन अॅड. नितीन सातपुते यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.
ः दिव्यांग खेळाडूंची खडतर ‘पाठशाळा’
याचिकाकर्ते सातपुते यांनी सांगितलं की, राज्यपालांनी देशद्रोहासारखं कृत्य केलं आहे. भारतीय घटनेतील अनुच्छेद ३६१चं राज्यापालांना प्रोटेक्शन आहे. हे प्रोटेक्शन निघालं की त्यानंतर महाभियोग चालेल. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकसुद्धा होऊ शकते.
याचिकाकर्ते सातपुते यांनी या प्रकरणी पाच न्यायाधिशांचं घटनापीठ बसवावं, अशी मागणी केली आहे. आता २२ डिसेंबर रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे उदयनराजे यांनीदेखील राज्यपालांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवलेलं असून राष्ट्रपतींनी त्यांच्या पत्राची दखल घेतल्याचं सांगितलं जात आहे.