शिवसेना प्रमुखांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूरमध्ये सध्या नागपूर- मुंबई महामार्गाच्या उद्घाटनाच्या तयारीची धावपळ सुरू आहे. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच उद्घाटनापूर्वी महामार्गाची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमध्ये दाखल झाले.
विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. ते म्हणाले या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. त्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार हे मी भाग्य समजतो., असे शिंदे म्हणाले. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संकल्पना होती. ती तत्कालीन सा. बा. मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात आणली. नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्गाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. तेव्हा मी नगरविकास मंत्री होतो. आता मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे, असे शिंदे म्हणाले.

Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’