“महाराष्ट्रातून पळवलेल्या.” ; गुजरात निवडणूकीच्या जाहीरनाम्यावरून रोहित पवारांचा हल्लाबोल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गुजरातमधील सत्ताधारी भाजपने काल(२६ नोव्हें.)आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास पाच वर्षांत २० लाख रोजगार उपलब्ध करून दिले जातील,असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.दरम्यान,यावरून आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,”महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगातील नोकऱ्यांच्या बळावर २० लाख नोकऱ्या देण्याचा गुजरात भाजपचा निवडणूक जाहीरनामा!वेदांता-फॉक्सकॉन (पुणे)-२ लाख,बल्कड्रग पार्क (रायगड)-१ लाख,टाटा एअरबस (नागपूर)-१० हजार,IFSC सेंटर (मुंबई)-२ लाख,याशिवाय मरीन पोलीस अकादमी (पालघर),केंद्रीय कामगार कल्याण मंडळ व राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था (नागपूर),मुंबई विमानतळ मुख्यालय,हिरे व्यापार,जहाज बांधणी कारखाना अशी ही यादी खूप लांबलचक आहे.’गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने केला ‘त्याग’आणि इथल्या युवांच्या वाट्याला आले भोग,’ असंच यानिमित्ताने म्हणावं लागेल”,असे रोहित पवार म्हणाले आहेत.
रोहित पवार यांचे ट्विट :-
काय म्हंटले आहे भाजपच्या जाहीरनाम्यात :-
राज्यात पुन्हा सत्ता आल्यास पाच वर्षांत २० लाख रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. कट्टरपंथीयांविरोधात एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्याविषयीच्या काही मुद्द्यांचाही यात समावेश आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अन्य नेते उपस्थित होते.