शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याला 4 मंत्री, 2 आमदारांची दांडी ; चर्चांना उधाण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार सहकुटुंब आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत.
मात्र या दौऱ्याला चार मंत्री आणि दोन आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे गटाने आज कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावेळी शिंदे गटाचं आसाममध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मात्र या दौऱ्यात मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभुराज देसाई आमदार चंद्रकांत पाटील आणि महेश शिंदे गैरहजर राहिले आहेत.
यावर या नेत्यांकडून स्पष्टकरण देण्यात आलं असून आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्हा आमदारांची इच्छा होती गुवाहाटीला जाण्याची, मात्र आज ग्रामीण भागात लग्नाची तिथी होती. त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. तर गुलाबराव पाटील म्हणाले की, निवडणुकीमुळे मी जावू शकलो नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मी नाशिकला आधीच वेळ दिला होता. नाशिक येथे शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता. नाशिकमध्ये अनेक प्रयोग होतात. त्या प्रयोगांचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा, म्हणून मी नाशिकमध्ये होतो. तर अनिल बाबर म्हणाले की, बायकोचा वाढदिवस आहे. उद्या घरगुती कार्यक्रम आहे. त्यामुळे गुवाहाटीला जावू शकलो नाही. एकंदरीतच मंत्र्यांनी आणि आमदारांनी दांडी मारल्यामुळे शिंदे गटात नाराजी कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर कडाडून टीका करण्यात आली. महाराष्ट्रातील देवं संपले का, जे दर्शनासाठी गुवाहाटीला गेले, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….