संविधान दिनी १०१ संविधानाच्या प्रतीचे करण्यात आले वाटप ; रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने राबविण्यात आले विविध उपक्रम…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- भारत सरकारकडुन बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त श्रदधांजली वाहण्याकरीता २०१५ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी प्रथम अधिकृत संविधान दिन साजरा केला गेला होता.
संविधानदिन हा दिवस भारतीय संविधानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता तसेच आंबेडकरांच्या विचारांचा जगभरात प्रसार करण्याच्या उददिष्टाने दरवर्षी संपूर्ण भारतात मोठया आनंदात अणि जल्लोषात साजरा केला जात असतो.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिनी विविध उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. संविधाना विषयी जनजागृती निर्माण होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता मुल्यांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या हस्ते संविधानाच्या १०१ प्रतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी शुद्धोधन दिवेकर, बंडू चिंचोलकर, बालाजी साखरे, फिरोज खान, बालाजी कल्याणकर, आशिष देशमुख, बालाजी चिंचोलकर, दिगांबर देशमुख, हबीब मामु, उत्तम तास्के, नत्थु दर्शनवाढ, क्रांतीशील नरवाडे, शरद चव्हाण, प्रवीण सांगडे, ऍड पंजाब नवसागरे गौतम नवसागरे, साहेबराव कदम, उत्तम बनसोड, कुणाल दवणे,संभाजी हापसे, दिलीप मुनेश्वर, संदीप राऊत, अनिल हापसे, भीमराव खंदारे, गजानन सूर्यवंशी, कुंडलिक डुकरे, संतोष पाईकराव, संतोष कांबळे, संभाजी पाठमोरे, व्यंकटराव हटकर, महेंद्र बडेराव, किरवले सर, राजेश वाडे व मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.