आला थंडीचा महिना….! राज्यात हुडहुडी वाढली, तर ‘या’ भागात पावसाचा अंदाज…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होतोना दिसतेय. त्यामुळे राज्यात हुडहुडी वाढली आहे. पण एकीकडे थंडीची चाहूल लागलेली असताना पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील उत्तरेकडे थंडी तर, कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १३.३ अंश सेल्सिअस नोंदवम्यात आले आहे. अनेक शहरांत किमान तापमानात घट झाली आहे. अनेक शहरांचं तापमान १७ अंशांखाली आलं असून यामध्ये नाशिक, महाबळेश्वरसह २६ शहारंचा समावेश आहे. उत्तर भारतात होत असलेल्या हवमान बदलांमुळे सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण राहाण्याची शक्यता आहे. हे वातावण कमी झाल्यास तापमानात किंचित घसरण होणार आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
कोणत्या शहरांत किती तापमान..?
सोलापूर १७.७
उदगीर १५,
कोल्हापूर १७.८
मालेगाव १७.२
उस्मानाबाद १६.४
नाशिक १४.३
नांदेड १६.४
जळगाव १७
पुणे १३.३
जालना १६.२
औरंगाबाद १४.२
बारामती १३.९
महाबळेश्वर १३.४
परभणी १५.५
सांगली १६.९
अमरावती १७
बुलढाणा १७.४
चंद्रपूर १७.६
गडचिरोली १५.६
गोंदिया १६
वाशिम १७
यवतमाळ १५
मुंबई २३.२

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….