तर मी राजीनामा दिल्याची बुधवारी ब्रेकिंग न्यूज येऊ शकते ; सत्तार यांचं सर्वात मोठं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- तुम्ही दारू पिता का? असं एका अधिकाऱ्याला विचारल्याने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्तार यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
विरोधकांनीही या प्रकरणी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (cm eknath shinde) सांगितलं सत्तारांनी राजीनामा द्यावा, तर बुधवार पर्यंत माझ्या राजीनाम्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी तुमच्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते. सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण गदा घेऊन येतं आणि त्याचा मुकाबला आमची ढाल तलवार कशी करते हे तुम्हाला दिसेल. चंद्रकांत खैरे यांनी माझ्या विरोधात येऊन लढावं. त्यांच्यासाठी सिल्लोडचं मैदान खाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी हातात घेतलेल्या गदेसाठी हनुमानाची ताकद लागते. ती ताकद खैरे यांच्याकडे नाहीय ते माझ्याशी काय लढणार? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.
यापूर्वीच एक विकेट मी इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून घेतली आहे. माझ्याकडे अचूक बॉलिंग आहे. कुणाची कशी विकेट घ्यायची, कशा परिस्थितीत घ्यायची हे मला माहीत आहे. बॅटिंगला येणाऱ्या प्रत्येकाला माझा हा इशारा आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री ज्याची विकेट घ्यायला सांगतील त्याची विकेट घेणार, असा इशाराही त्यांनी दिला.
आमचे हनुमान महाराज देशाचे दैवत आहेत. ज्या प्रमाणे हनुमान हे प्रभू रामाचे भक्त आहेत. तसाच मी एकनाथ शिंदे यांचा भक्त आहे. दोघांचीही मॅच होऊनच जाऊ द्या. मी कृषीमंत्री आहे. आमदार आहे. पण खैरेंकडे कोणतंच पद नाही. राजीनामा दिल्यावर त्यांच्या नेत्यांनी येऊन लढावं. आता काय ते उद्याच होऊ द्या, असं आव्हान यांनी केलं.
आमदारांच्या सुरक्षेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हल्ल्याची चिथावणी होती म्हणून आमच्या आमदारांना सुरक्षा देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्लॅन असल्याचा रिपोर्ट आला होता. आमदारांवर हल्ले होणार होते. भविष्यात आमदारांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सुरक्षा देण्यात आली आहे. काही लोकांचा काही तरी घातपात करण्याचा संशय होता म्हणून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….