शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पोहरादेवी दौऱ्याची नियोजन बैठक शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांची पोहरादेवी येथे बैठक संपन्न…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पोहरादेवी :- दानशूर संत बाबनलाल महाराज संस्थान श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली,या बैठकीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पोहरादेवी येथील दर्शन तथा दौऱ्या संबंधीची तारीख निश्चित करण्याच्या दृष्टीने सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेचे अध्यक्ष स्थान मा.राज्य मंत्री श्री संजय देशमुख यांनी भूषविले तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी पोहरादेवी महाशक्ती पिठाचे महंत सुनील महाराज,सुधीर सूर्यवंशी (अमरावती जिल्हा शिवसेना प्रमुख), मा.आमदार बाळासाहेब मुनगिनावर, संतोष ढवळे (शिवसेना संपर्क प्रमुख यवतमाळ), मनीष शाह (मा.बांधकाम सभापती न. प.पुसद) , राजू नाईक (मा.राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ (पुसद) श्री रविकांत राठोड (बंजारा ब्रिगेड अध्यक्ष), ऍड. साजिद वर्षांनी, प्रवीण शिंदे (शिवसेना जिल्हा प्रमुख), किशोर भाऊ राठोड (से.नी.जिल्हा न्यायाधीश), किशोर आडे (मा.जी.प.उपाध्यक्ष यवतमाळ), डॉ.सुभाष राठोड (अकोला),बळी राठोड व इतर मान्यवर विराजमान होते.महाशक्ती पिठ संस्थान तर्फे अनिल महाराज, गोपाल महाराज(वाई), पुंडलिक महाराज , केशव महाराज यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.क्रीडा राज्य मंत्री संजय भाऊ देशमुख यांचे स्वागत केले तर, महंत सुनील महाराज यांचे स्वागत श्री मनीष शाह (पुसद) यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.वसंत राठोड तर प्रास्ताविक महंत सुनील महाराज यांनी केले. आभार प्रदर्शन किशोर राठोड (से.नी.जिल्हा न्यायाधीश) यांनी केले.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक , पदाधिकारी व बंजारा बांधव उपस्थित होते.