देशाची आणि राज्याची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी….. ; शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राजकरण म्हटलं की नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रसरकारवर चांगलाच हल्लबोल केला आहे. सध्या देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे.
यावरूनच शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. देशाची आणि राज्याची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हिताची जपणूक करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे पण तास होत नाहीय. जेव्हा माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती. तेव्हा तीन महिन्यांच्या आत 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याचाच दाखला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी शरद पवारांनी संवाद साधला. त्यावेळी एका शेतकऱ्याने शरद पवार यांना बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. त्यावर शरद पवार म्हणाले, “जेजुरीच्या सहकऱ्यांनी सांगितले, बाहेर फिरु नये. त्यांना वाटतं मी म्हातारा झालो. कुणी सांगतिलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं? मी म्हातारा झालो नाही,” शरद पवार असं म्हणाले आणि उपस्थित असलेल्या सर्वांमध्येच हश्या पिकाला.
शरद पवार जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हाचा दाखला देत पवार म्हणाले, “मी केंद्रीय मंत्री असताना देशात फळबाग योजना आणली. त्याअंतर्गत फळबाग घेण्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा केले. कोकणात गेला तर, काजू आणि हापूस आंब्याचे हजारो एकर क्षेत्र आहे. एकेकाळी कोकणाचे लोक 16 वर्षे वय झाले की, मुंबईला कामासाठी जायचे. 60 वय झालं की पुन्हा गावाकडे माघारी यायचे. आज मुंबईला जायची भूमिका कोकणातील लोकांची नाही. फळबाग योजनेतून जास्तीत जास्त आंबा, काजू, फणस इत्यादी झाडांची लागवड करून त्यातून उत्पन्न घेतात आणि आज यासाठीच प्रयत्न करतात,” असं सुद्धा शरद पवार यांनी नमूद केले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….