महाराष्ट्रात अशी असेल राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पदयात्रा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड़ :- कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ पदयात्रा काढण्यात आली आहे. कन्याकुमारी येथून या पदयात्रेला सुरूवात झाली असून ही पदयात्रा एकूण १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे.
दरम्यान, ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून राज्यात ती ३८२ किमीचा प्रवास करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.
असे असेल महाराष्ट्राचे वेळापत्रक
‘भारत जोडो’ पदयात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन होईल. ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान ही पदयात्रा नांदेडमध्ये असेल. यादरम्यान चार ठिकाणी या यात्रेचे मुक्काम असेल. ११ ते १५ नोव्हेंबर ही यात्रेचे हिंगोतील आगमन होईल. तर १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाशिम, १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला आणि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. तसेच नांदेड आणि शेगाव येथे राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत.
उद्धव ठाकर, शरद पवारांनाही निमंत्रण
राहुल गांधी यांची ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपाची विचारधारा मान्य नसणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी देशाची अखंडता अबाधित राहावी, यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील ‘भारत जोडो’ पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….