इम्तियाज जलील यांनी सांगितलं संजय शिरसाटांना हृदयविकाराचा झटका येण्याचं राजकीय कारण; म्हणाले, “भुमरेंना.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- बाळासाहेबांची शिवसेना गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. काल ( १७ ऑक्टोंबर ) दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज ( १८ ऑक्टोंबर ) सकाळीच त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.
संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. शिरसाट यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना छातीमध्ये दुखत होतं, तसेच अस्वस्थ वाटत होतं. त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. रक्तदाब कमी करण्याची औषध देण्यात आली. तसेच त्यांची प्रकृती स्थीर करण्यासाठी आवश्यक ते उपचार करण्यात आले,” अशी माहिती औरंगाबाद सिग्मा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली होती.
संजय शिरसाटांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी चिमटा काढला आहे. जलील म्हणाले की, “शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हा संजय शिरसाट खूप आक्रमक होते. मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांची अपेक्षा होती, शिरसाटांना मंत्रीपद मिळेल. मात्र, त्यांना त्यातून वगळण्यात आलं. त्यांनतर संदीपान भुमरेंना पालकमंत्रीच्या खुर्चीत पाहिल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढला असेल. पण, शिरसाट यांची बातमी मिळाल्यानंतर मला खूप धक्का बसला,” असेही जलील यांनी म्हटलं. ते ‘पत्रकारांशी’शी बोलत होते.
दरम्यान, हृदयविकाराच्या झटका आल्याची माहिती मिळताच स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. शिंदेंनीच शिरसाटांना मुंबईत येऊन उपचार घेण्यासंदर्भात विचारणा केली. शिंदेंनी स्वत: कार्डीओलॉजिस्ट असलेल्या डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पर्कार यांच्यासोबत चर्चा करुन शिसराट यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात चर्चा केल्याचंही समजतं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….