मल्लिकार्जुन खरगे की शशी थरूर…? 96 टक्के मतदान, काँग्रेसला उद्या मिळणार नवीन अध्यक्ष…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडले. 9900 मतदारांपैकी 9500 जणांनी आपला हक्क बजावला असून, मतदानाची टक्केवारी 96 आहे. मतमोजणी आणि निकाल बुधवारी (दि. 19) लागणार आहे.
त्याच दिवशी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे की शशी थरूर? याचा फैसला होईल आणि काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहे.
22 वर्षांनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे पेंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसुदन मिस्त्र्ााr यांनी पत्रकारांना माहिती दिली. ही निवडणूक लोकशाही मार्गाने आणि शांततेत पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 9900 मतदार (राज्य प्रतिनिधी) आहेत. त्यातील 9500 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 96 टक्के मतदान झाले.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह 87 जणांनी दिल्लीत ‘एआयसीसी’ मुख्यालयात मतदान केले.
‘भारत जोडो यात्रा’ सध्या कर्नाटकात आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह 50 जणांनी बेल्लारी येथे मतदानाचा हक्क बजावला.
अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी बंगळूरू येथे तर शशी थरूर यांनी थिरूअनंतपूरम येथील प्रदेश कार्यालयात मतदान केले.
देशभरातील 40 ठिकाणी 68 बुथवर मतदान झाले. सर्व मतपेटय़ा उद्या (दि. 18) पर्यंत दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात आणण्यात येतील आणि बुधवारी मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीपूर्वी सर्व मतपत्रिका एकत्रीत करण्यात येतील. राज्यनिहाय मतमोजणी होणार नाही.
महाराष्ट्रातून 96 टक्केमतदान
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या दादर येथील टिळक भवन येथे पार पडली. या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्या 561 पैकी 542 मतदारांनी म्हणजेच 96% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात पोस्टल मतदानाचाही समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….