संजय राऊत दिवाळीला घरी येणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते.
आजच्या सुनावणी वेळीही त्यांची न्यायालयीन कोठडीत आणखी तीन दिवस वाढ कऱण्यात आली आहे. आता २१ ऑक्टोबर २०२२ ला पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहेत.
जामीनावरील सुनावणी नंतर बाहेर पडताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही आज न्यायालयाच्या आवारात संजय राऊत यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यावेळी दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. त्यानंतर, सर्व काही ओक्के आहे, आपण लवकरच बाहेर येणार, असे संजय राऊत म्हणाल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्यामुळे २१ ऑक्टोबरला जर संजय राऊतांना जामीन मिळाला तर ते दिवाळीला घरी येण्याची शक्यता आहे.
आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान राऊतांचे वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला. अलिबागच्या प्लॉट खरेदी प्रकरणात प्लॉटधारकांच्या जबाबात तफावत आहे. प्रविण राऊतांसोबत झालेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांबाबत आम्ही कोणतीही माहिती लपवून ठेवली नसल्याचे मुंदरगी यांनी सांगितले. पण तपास यंत्रणांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही कोणत्याही प्रकराचे मनी लॉण्ड्रिग किंवा कोणताही गुन्हा केलेला नसल्याचेही मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.
तसेच, आमच्या सर्व व्यवहारातील हेतू स्पष्ट होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या केसच उदाहरण देत मुंदरगी म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावरही तीन आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले गेले. तसेच संजय राऊत यांच्यावरही केले आहेत. पण हे दोन्ही खटले सारखेच आहेत. त्यांच्यावरही संस्थांमधून पैसे फिरवल्याचे आरोप करण्यात आले पण जर या सर्व व्यवहारांची कागदपत्रे आहेत तर त्यांच्यावर हे आरोप का केले गेले, असा सवाल मुंदरगी यांनी उपस्थित केला. तसेच, अनिल देशमुख यांच्या केसचा आधार घेत संजय राऊत यांनाही जामीन देण्याची मागणी यावेळी मुंदरगी यांनी न्यायालयाकडे केली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….