राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक ; AIIMS मध्ये ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सगळ्यांना खळखळून हसवणारे दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला.
सकाळी जीममध्ये वर्कआऊट करत असताना ते ट्रेडमिलवरच कोसळले. त्यानंतर त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं सुरूवातीला त्यांना इमर्जन्सी मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. परंतु नंतर त्यांना सीसीयूमध्ये हलवण्यात आलं.
जीममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एंन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एन्जिओग्राफिमध्ये एका ठिकाणी १०० टक्के ब्लॉक सापडल्याचं सांगण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कॉमेडियन सुनील पाल यांनं एन्स्टाग्रामवर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक व्हिडीओ शेअर केला. तसंच त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असं त्याने व्हिडीओत म्हटलं आहे. राजू श्रीवास्तव कॉमेडीचे बादशाह मानले जातात. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचं होते आणि त्यांनी हे स्वप्न पूर्णही केलं. राजू यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….