उद्धव ठाकरेना धक्का ; विधिमंडल कामकाज समितीत एकही सदस्याची नियुक्ती नाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 10 ऑगस्ट :- उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटामधल्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून दादा भुसे (Dada Bhuse) आणि उदय सामंत (Uday Samant) यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी पत्र लिहून समितीच्या सदस्यपदासाठीच्या नियुक्तीचं पत्र द्यावं आणि समितीच्या बैठकीला आमंत्रित करावं, अशी मागणी पत्र लिहून प्रधान सचिवांकडे केली होती, पण विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. विधिमंडळ कामकाज समितीतल्या सदस्य नियुक्तीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर पक्षांच्या गटनेत्यांना विधिमंडळ सचिवांनी पत्र पाठवलं आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या गटाला असं पत्र मिळालेलं नाही. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांची गटनेतेपदी तर सुनिल प्रभू यांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती.
प्रत्येक अधिवेशनाआधी विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होते. या बैठकीत विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चर्चा केली जाते. यंदाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे, त्यामुळे ते वादळी ठरणार हे निश्चित आहे.
विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांना घेऊन बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांच्या शपथविधीनंतर काल भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 अशा 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….