शिवसेनेला दिलासा ; पुरावे सादर करण्या साठी निवडणूक आयोगा कडून 4 आठवड्यांची मुदत.….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेतील बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच दुसरीकडे केंद्रीय निवडणुक आयोगाने पक्षासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश शिंदे गटाला आणि शिवसेनेला दिले होते.
मात्र, यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्याला निवडणुक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला असून आता यासंदर्भातील पुरावे 4 आठवड्यात सादर केले तरी चालणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून त्याअनुशंगाने सुरु असलेल्या प्रक्रियेला पुरेसा वेळही मिळणार आहे. सोमवारी मुदतवाढीच्या अनुशंगाने अर्ज करण्यात आला होता. आगामी चार आठवड्यातील शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेला पुरावे सादर करता येणार आहेत.
अर्जावर ग्रीन सिग्नल
केंद्रीय निवडणुक आयोगाने शिंदे गटाला आणि शिवसेना पक्षाला पुरावे सादर करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. या पुराव्यांच्या आधारेच आता पक्ष कुणाचा हे ठरवले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार पुरावे सादर करण्यासाठी निवडणुक आयोगाकडून मुदत वाढ मिळावी अशी मागणी अर्जाद्वारे शिवसेनेने सोमवारी केली होती. यावर निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेला 4 आठवड्याचा कालावधी असणार आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून पुरावे गोळा करण्यास वेळ असणार आहे.
शिंदे गटाने सादर केले पुरावे
शिंदे गटाकडून आता शिवसेना पक्षावर हक्क सांगितला जात आहे. त्यावरुन हे प्रकरण केंद्रीय निवडणुक आयोगाकडे आहे. दोन्हीकडून यासंदर्भात पुरावे सादर करावे अशा सूचना दिल्यानंतर शिवसेना आणि शिंदे हे दोन्हीही कामाला लागले आहेत. शिवसेनेकडून जरी वाढीव मुदत घेण्यात आली असली तरी दुसरीकडे शिंदे गटाने मात्र, वकिलांमार्फत पुरावे दिले आहेत. त्यामुळे दोन्हींकडून पुरावे सादर झाल्यानंतर निवडणुक आयोग काय निर्णय घेणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे.