“तीन दिवसात बॉम्बने उडवून देऊ” ; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तीन दिवसांमध्ये बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीवजा संदेश आदित्यनाथ यांना सोशल मीडियावर देण्यात आला आहे.
या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी तपास सुरू आहे.
आरोपीचा शोध सुरू
उत्तर प्रदेशच्या मुख्यालयाच्या ११२ या व्हाॅटस्ॲप नंबरवर एक मेसेज आला होता. त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा नंबर शाहिद खान नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे. या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. व्हाॅटस्ॲप नंबरच्या आधारे पोलीस आरोपीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी लखनऊच्या गोल्फ सिटी ठाण्यात आरोपी शाहिद खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला पकडण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी मिळाल्या आहेत धमक्या
पोलिसांनी व्हाॅटस्ॲपवर आलेल्या या धमकीचा स्क्रीन शॉटही गुप्तचर यंत्रणांना दिला आहे. योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही त्यांना अशा प्रकारच्या अनेकदा धमक्या देण्यात आल्या होत्या.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….