मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द ; मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला.
त्यामुळे विस्तार आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिंदे आता दिल्लीत परत कधी जाणार, हेही निश्चित नाही.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि काही बैठकांनंतर शिंदे दिल्लीला रवाना होणार होते. आज दिल्लीत त्यांचा मुक्काम होता. ते कोणाला भेटणार, याबाबत त्यांच्या कार्यालयाने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत काही ज्येष्ठ वकिलांशी ते चर्चा करणार होते आणि भाजपच्या श्रेष्ठींनादेखील विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी भेटणार होते, अशी माहिती आहे. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गुरुवारी दिल्लीला जात आहेत. ते २९ जुलै रोजी मुंबईत परततील. त्यामुळे दोन दिवस तरी विस्तार होणार नाही, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आतापर्यंत चारवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत.
मंत्रिमंडळाची चौथी बैठकही दोघांचीच
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळाची बुधवारची बैठकही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच उपस्थितीत झाली.
नवीन सरकार आल्यानंतरची ही चौथी बैठक होती. पहिली बैठक शपथविधीच्या दिवशी म्हणजे ३० जूनला झाली होती. त्यानंतर १४ आणि १६ जुलैरोजी मंत्रिमंडळ बैठक झाली होती.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….