महागाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करा ; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- मागील दहा दिवसांपासून अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे महागाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून केली आहे.
मागील पंधरा वीस दिवसापासून सातत्याने पावसाने कहर करीत उभे पिके उध्वस्त केली.हजारो हेक्टर शेतजमिनीत पाणी साचून पिकांची अवस्था धुळीस मिळविली.अनेक शेतजमिनी खरडून गेल्या असून महागाव तालुका प्रभावित झाले आहे.त्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांची स्थिती लयास गेली आहे.तात्काळ कृषी विभागामार्फत सरसकट पंचमाने करण्याचे निर्देश देवून शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा करावे अशी मागणी महागाव तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,तालुका संघटक रवींद्र भारती,शहर प्रमुख तेजस नरवाडे,माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे,नगरसेवक रामराव पाटील नरवाडे,शुभम सरगद, सतीश नरवाडे,राम तंबाखे व आदी पदाधिकारी , व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.