असा कुठलाही सल्ला शरद पवारांनी दिला नाही ; शिंदेना मुख्यमंत्री करायची सल्ला वर राऊतांचं स्पष्टीकरण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या सल्ल्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पवारांनी असा कुठलाही सल्ला दिला नसल्याचे राऊतांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केले.
शरद पवार यांनी दूरध्वनीवरुन मुख्यमंत्र्यांना संपर्क साधून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला (Advice) दिल्याचे म्हटले जात होते. मात्र संजय राऊतांनी ही बाब कोढून काढत या चर्चेला पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली.
काय म्हणाले संजय राऊत…..?
अशा प्रकारचा कोणताही सल्ला माननीय पवार साहेबांनी दिला नाही. किंबहुना ही लढाई आपण शेवटपर्यंत लढायची, अशी भूमिका माननीय शरद पवारांनी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील आणि तेच राहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर रहायला जात आहे. मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्याची मोह माया नाही. मातोश्री हे शिवसेनाप्रमुखांचं मूळ स्थान आहे. अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करुन दाखवू, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मी सकाळपासून इथेच आहे. माननीय शरद पवार आता येऊन गेले. जयंतराव अशोकराव चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुप्रिया ताई सर्व आतमध्ये आहेत. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी येऊन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी यासंदर्भात ज्या सद्भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आभारी आहोत, असे राऊत म्हणाले.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….