दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६आहे.
२०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात कोकण विभाग पहिला तर नाशिक शेवटी
पुणे: ९६.१६
नागपूर: ९७.००
औरंगाबाद: ९६.३३
मुंबई: ९६.९४
कोल्हापूर: ९८.५०
अमरावती: ९६.८१
नाशिक: ९५.९०
लातूर: ९७.२७
कोकण: ९९.२७
निकाल कुठे पाहाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
http://ssc.mahresults.org.in
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० ते २९ जून
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० जून ते ९ जुलै
प्रथम श्रेणीसह ६,५०,७७९विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. २४विषयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तब्बल १२,२१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बोर्डाने म्हटलंय.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!