कोरोना संसर्गावरील उपचारासाठी सोनिया गांधी रुग्णालयात दाखल ; सध्या प्रकृती स्थिर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- करोना संसर्गावर उपाचार घेत असलेल्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधी २ जून रोजी त्यांना करोनाची लागण झाली होती.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे.
“करोनाशी संबंधित समस्येमुळे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते तसेच सोनिया गांधी यांच्या हितचिंतकांचे आम्ही आभार मानतो,” असे रणदीप सुरजेवाला आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

सोनिया गांधी यांची २ जून रोजी करोना चाचणी सकारात्मक आली होती. करोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांनी नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीसमोर चौकशीसाठी हजर होण्याकरीता आणखी वेळ मागितला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना येत्या २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाचे समन्स जारी करण्यात आले आहे. याआधी त्यांना ८ जून रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे सांगण्यात आले होते.
तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनादेखील १३ जून रोजी नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. याआधी २ जून रोजी त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. मात्र परदेशात असल्यामुळे राहुल गांधी यांनी आणखी वेळ मागितला होता. त्यानंतर आता ते १३ जून रोजी ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राहुल गांधी १३ जून रोजी म्हणजेच सोमवारी ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे सोमवारी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाऊ शकते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…