महागाव तालुक्यातील जि.प गट.आणि प.स. गणाचे पुनर्रचनेवर अॅड.डी.बी. नाईकांचे गंभिर आक्षेप तर मुडाणा जि.प. गटाची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या प्रमाणे यवतमाळ जिल्हा प्रशासनाने दिनांक २ जुन २०२२ रोजी महागाव तालुक्यातील जि़प गट व पंस गणाची गावासह माहिती प्रसिद्ध केली आहे आणि यावर दिनांक ८/६/२०२२ पर्यंत लेखी आक्षेप जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे दाखल करण्याची मुदत दिली आहे
यावर अॅड.कॉ.डी.बी.नाईक माजी सभापती महागाव यांनी गोपनीयता,दिशा, सलगता, नैसर्गिक सीमारेषा आणि नैसर्गिक न्याय या आयोगाच्या तत्व व नियमाच्या आधारे गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदवले आहेत.
तहसील प्रशासनाने मनमानी पद्धतीने आराखडा तयार करून कसा पक्षपाती पणा केला आहे ,या संदर्भात प्रत्यक्ष अमोल येडगे जिल्हाधिकारी यांची कॉ, देवीदास मोहकर माजी जीप सदस्यासह भेटुन लक्ष वेधले आहे
डी.बी.नाईकांनी लेखी आक्षेप अर्जात नमूद केले आहे की, स्थानिक प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ४ऑक्टोबर २०११ आणि दिनांक १० में २०२२ या दोन्ही आदेशाचे पालन केलेले दिसत नाही, जसे की रचनेची सुरुवात करतांना तालुक्याच्या उत्तरेकडुन ईशान्य, पुर्वे दिशेला सरकावे परत पुर्वेकडुनच पश्चिमेकडे जावे आणि परत पश्चिमेडुन पुर्वेकडे जावुन रचनेचा शेवट दक्षिण दिशेला करने बंधनकारक करण्यात आले आहे या प्रसिद्ध झालेल्या आराखड्यात रचना करतांना सुरुवात उत्तरेकडुन केलेली आहे परंतु पुर्वेला जावुन प्रक्रिया थांबविली आहे कारण गट क्रमांक ५७ उत्तरेला ,५८ ईशान्येला आणि ५९ या गटाची पुर्वेला निर्मिती केली परंतु पुढील रचना करतांना पुर्वेकडुन पश्चिम दिशेला न जाता सरळ नव्याने पश्चिम दिशे पासुनच सुरुवात करुन गट क्रमांक ६०,६१ आणि ६२ निर्मिती करतांना शेवट सुध्दा पूर्वेला च केल्यामुळे रचने बाबत दिलेल्या सुधारित आदेशातील मुद्दा क्र, १० चा सरळ सरळ भंग झाला आहे
विशेष म्हणजे तालुक्याच्या दक्षिणेस विदर्भातील उमरखेड तालुका असतांना नकाशात मराठवाड्यातील हदगाव तालुका दर्शविलेले आहे ही अक्षम्य चुक आहे या आराखड्यात सलगता पाळलेली नाही कारण गट क्रमांक ५९ व ६० च्या सीमारेषा एकमेकांशी कोठेच सलग नाहीत त्यामुळे आदेशातील मुद्दा क्रमांक ९ चा भंग झाला आहे तसेच पुस नदीमुळे जी नैसर्गिक सीमारेषा निर्माण झाली आहे ती न पाळता या नदीवर पुल नसतांना दक्षिणेकडील मोरथ गण गुंज गटाला आणि मुडाणा गण सवना गटाला जोडून नैसर्गिक सीमारेषा पाळण्याच्या १० मे २०२२ च्या आदेशाचा भंग झाला आहे या प्रक्रियेत जी माहिती ६ महिन्यापुर्वीच उघड झाली आहे ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झाले आहे ती माहिती तंतोतंत पुन्हा प्रसिद्ध करुन गोपनियता पाळण्याच्या आदेशाचा भंग झाला आहे, जुना हिवरा गट शाबुत (अतिरिक्त गावे वगळून आहे ती गावे जुनीच आहेत) ठेवुन बाकीच्या जुन्या चारही गटात मोठ्या प्रमाणात फेरबदल केल्यामुळे काही गट, गणात पुन्हा जुनेच आरक्षण येवु शकते हा पक्षपाती पणा आहे,
तालुक्यात एक गट व दोन गणाची वाढ झाल्यामुळे नवनिर्माण होणारा सहावा गट हा नैसर्गिक न्यायाने आराखड्याचा शेवट करतांना दक्षिणेस अपेक्षित असतांना उत्तरेलाच माळकिन्ही गट दर्शविले आहे, तो रद्द करुन पुस नदीची नैसर्गिक सीमारेषा पाळुन तालुक्याच्या दक्षिणेकडील मोरथ गण हा मुडाणा गणाला जोडून जि, प, मुडाणा गट निर्माण करावा अशी कायदेशीर मागणी आयोगाचे आदेश,नियम अधिनियम व त्यातील कलम, क्रमांकासह जोरदारपणे अॅड, कॉम्रेड नाईकांनी केली आहे
जनआंदोलक डी, बी, नाईकांनी इतिहासात त्यांच्या अभ्यासुपणा व खंबीर व्रुत्तीमुळे अनेक लढे यशस्वी केले आहे वेळ प्रसंगी या मुडाणा जिल्हा परिषद गटासाठी न्यायालयात जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे, अशी माहिती नाना भाऊ पानपट्टे मुडाणा आणि अंकुश आडे भांब यांनी कळविले आहे, त्यामुळे तालुक्याचे लक्ष या विषयाकडे लागले आहे.